Rain UPDATES | पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

Rain UPDATE | मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2020 04:21 PM

पार्श्वभूमी

मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात 3 आणि...More

बेळगाव- पावसाने शहर परिसरात चांगली हजेरी लावली असून दिवस रात्र पावसाचा जोर असल्यामुळे नद्या,नाले,ओढे ओसंडून वाहत आहेत.शेतकऱ्यांना हा पाऊस वरदान ठरला आहे.दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला आहे.सोसाट्याचा वारा वाहत असून पाऊसही मुसळधार सुरू आहे.मार्कंडेय नदीचे पावसामुळे पात्र विस्तारले असून नदीकाठच्या जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत.शहरातील सखल भागात रस्त्यावर पाणी आले होते.खानापूरच्या मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.मलप्रभा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.गेल्या चोवीस तासात 72 मिमी पाऊस झाला आहे.तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे संपर्क तुटला आहे.शास्त्रीनगर,महात्मा गांधी कॉलनी या भागात घरात पावसाचे पाणी शिरले आहे.पावसामुळे बेळगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या आणि घराच्या भिंती पडण्याच्या
घटना घडल्या आहेत.पावसामुळे शहर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे