मुंबई : जगातील सर्वात वजनदार महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात 7 मार्च रोजी इमानवर वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली.


शस्त्रक्रियेपूर्वी डाएट आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच तिचं 100 किलो वजन घटलं होतं. त्यानंतर आता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला हे इमानवर उपचार करत आहेत. पुढील सहा महिने या ठिकाणी इमानच्या लठ्ठपणावर उपचार होणार आहेत.



36 वर्षीय इमान वजनामुळे गेल्या 25 वर्षात घरातून एकदाही बाहेर पडली नव्हती. इजिप्तहून भारतात आलेल्या इमानचं महिन्याभरापूर्वीचं वजन 498 किलो होतं.

इमानवरील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आचा तिच्या रिपोर्टनंतर पुढच्या उपचारांना सुरुवात केली जाणार आहे.

दरम्यान इमानचा शस्त्रक्रियेनंतरचा पहिला फोटो काढण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आलेल्या लठ्ठ महिलेला क्रेनने उचललं

जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेचे वजन...