इमान अहमदचं तब्बल 262 किलो वजन घटलं!
एबीपी माझा वेब टीम | 15 Apr 2017 12:13 AM (IST)
मुंबई: 2 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर इजिप्शियन नागरिक इमान अहमदचं वजन 50 टक्क्यांहून अधिक घटल्याची माहिती तिच्यावर उपचार करणारे सर्जन मुफज्जल लकडावाला यांनी दिली आहे. 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत आलेल्या इमानचे वजन आधी 500 किलो होतं. पण आता त्यात 262 किलोंची घट होऊन अवघ्या 238 किलोंवर आलं आहे. लकडावाला यांनी आधी इमानच्या डाएटमध्ये बदल करत तिचं वजन 100 किलोंनी कमी केलं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन आणखी वजन कमी करण्यात यश आलं आहे. आतापर्यंत तिच्या शरीरातील पाण्याची मात्रा कमी करण्यात यश आलं असून, आता तिच्या शरीरातील चरबी घटवण्याचं आव्हान लकडावाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर आहे. संबंधित बातम्या: