मुंबई : एकीकडे कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक पालकांच्या उद्योगधंदे, व्यवसायवर मोठा परिणाम झाला. अनेकांना आपल्या मुलांची शाळेची फी भरणं कठीण झालं. तरीसुद्धा, राज्यातील अनेक शाळांनी फी साठी तगादा लावल्याने पालक आक्रमक झाले. तर दुसरीकडे मात्र वर्सोवातील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कुलने या काळात 3000 हजार विद्यार्थ्यांची फी माफ करत माणुसकी दाखवली आहे.


अंधेरी वर्सोवातील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कुल ज्या शाळेने केजी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तब्बल तीन महिन्याची फी माफ केली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यात रोजगार गेल्याने जिथे दोन वेळ खाण्याचा प्रश्न भेडसावत असताना अनेक पालकांना आपल्या मुलांची फी देणं शक्य होत नव्हते. त्यात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी फी माफ करत अविरत शिक्षण सुरू राहिलं पाहिजे या विचारातून या शाळेने मोठा निर्णय घेतला आहे

सर्व विद्यार्थ्यांची फी माफ करताना जवळपास 1 कोटी 80 लाख रुपये विद्यार्थ्यांच्या फी मध्ये माफ केले आहेत. अजूनही जे पालक फी भरू शकत नाहीत त्यांना मोफत शिक्षण दिले जातंय तर काही पालकांकडून अर्धी फी घेतली जात आहे. शाळा हे एक कुटुंब असल्याची भावना सर्वांच्या मनात जागृत करून पालकांनी सुद्धा शाळेचे आभार मानले आहेत.


या शाळेने फी माफ करण्याच्या निर्णयात शाळेच्या शिक्षकांनी सुद्धा मोठा वाटा उचलला आहे. जून पासून अर्ध्या पगारावर काम करत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आद्य कर्तव्य शिक्षक पार पाडत आहे. त्यासोबतच शाळेने सर्व फिक्स डिपॉसीट काढून तसेच शिक्षकांनी सुद्धा शाळा सुरू राहावी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी मेहनत घेतली आहे.


एकीकडे फी साठी तगादा लावणाऱ्या शाळा तर दुसरीकडे महामारीत सुद्धा माणुसकीचा दर्शन घडवणारी वर्सोव्याची शाळा. शाळा एक कुटुंब समजून त्याचे शिक्षण, पालक, विद्यार्थी हे घटक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणे हे आद्य कर्तव्य समजून घेत या शाळेने इतर शाळांसाठी एक आदर्श समोर ठेवला आहे.


School Fees Issue | फी भरा, शाळांचं आवाहन; पुण्यात पालक संघटना आक्रमक