मुंबई: नोटाबंदीनंतर आता लोकांना दुसरा मोठा धक्का बसणार आहे. कारण की, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे.
नोटाबंदीनंतर बँकेत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होत असल्यानं ICICI आणि HDFC यांच्यासह काही बँकांनी फिक्स डिपॉझिट (एफडी)च्या व्याज दरात. 0.25% ने कपात करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. कर्जाच्या व्याजदरातही कपात होण्याची शक्यता आहे.
ICICI बँकेकडून एफडीवरील व्याजदरात कपात:
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटनुसार, 390 दिवसापासून ते 2 वर्षापर्यंतच्या एफडीसाठी व्याजदर 0.15% ने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता एफडीवर 7.10 टक्के व्याज मिळणार आहे. पूर्वी हे व्याज 7.25 टक्के होतं.
HDFC बँकेकडून एफडीवरील व्याजदरात कपात:
एचडीएफसी बँकेनं 1 ते 5 कोटीच्या एफडीवरील व्याजदरात 0.25 % ने कपात केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवे दर आजपासून लागू होणार आहेत. एचडीएफसीच्या बँकेच्या 1 वर्षाच्या एफडीसाठी आता 6.75 टक्के व्याज मिळणार आहे. तर पूर्वी 7 टक्के व्याज दिलं जात होतं.
दरम्यान, एसबीआय आणि अॅक्सिस बँकेनंही व्याजदरात कपात केली आहे. काल एसबीआयनं काही एफडीच्या मॅच्युरिटीवर 0.15 टक्के कपात केली आहे.