मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या घोळामुळे राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची बदली करण्यात आली. पण विजयकुमार गौतम यांच्यासह एकूण 10 आयएएस अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे.
सध्या राज्यभर सुरू असलेल्या कर्जमाफीच्या घोळामुळं विजयकुमार गौतम यांची बदली करण्यात आल्याचं समजतं आहे. आता गौतम यांच्याकडे वित्त विभागाच्या लेखा आणि कोषागार विभागाच्या प्रधान सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पुणे आणि लातूर जिल्हा परिषदेचे सीईओंची देखील उचलबांगडी झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ डी.बी. देसाई यांची आता मुंबईत मंत्रालयात बदली झाली आहे. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. तर लातूर जिल्हा परिषेदचे सीईओ एम.जी.गुरुसाल यांची नागपूरमध्ये मनरेगाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

कुणाची बदली कुठे

 

क्रमांक

नाव सध्याचा कार्यभार

बदली झाल्यानंतर मिळालेला कार्यभार

1 वंदना कृष्णा वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य  सचिव (Accounts and Treasury) वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई (Reforms)
2. विजयकुमार गौतम माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव वित्त विभागाचे प्रधान सचिव, मुंबई
3. आर.व्ही.राजीव वित्त विभागाचे प्रधान सचिव (Reforms) वित्त विभागाचे (Expenditure) प्रधान सचिव, मुंबई
4. एस.व्ही.आर.श्रीनिवासन धारावी पुनर्विकास विभागाचे अधिकारी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, मुंबई
5. डी.बी.देसाई पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक, मुंबई
6. एम.जी.गुरुसाल लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ मनरेगाचे आयुक्त, नागपूर
7. एस.डी.मनधारे मंत्रालयातील सचिव कार्यालयाचे सह सचिव पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ
8. एस.जी.कोलते मनरेगाचे आयुक्त, नागपूर उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ
9. आर.डी.निवातकर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक मंत्रालयातील सचिव कार्यालयाचे सह सचिव
10. विपीन इतानकर गडचिरोलीतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ
  संबंधित बातम्या कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ IT विभागाच्या प्रधान सचिवांना भोवला