मुंबई : एकट्या भाजपचाच नाही तर मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप कार्यकारिणीच्या मुंबईत आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस यांनी कोणत्याही पदावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात वाद नसल्याचा दावादेखील केला.


कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या वादात आपल्याला पडण्याचे कोणतेही कारण नाही. मुख्यमंत्री हा जनता निवडत असते. आपल्या मित्रपक्षांकडे खुमखुमी असणाऱ्या लोकांची कमी नाही. तरीदेखील मीच पुढचा मुख्यमंत्री असेन.

फडणवीस म्हणाले की, मी आधीच सांगितलंय की, 'मी पुन्हा येईन, मग तुम्ही काळजी कशाला करता? मी केवळ भाजपचा मुख्यमंत्री नाही, शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच आहे. आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामसह सर्व मित्रपक्षांचा मुख्यमंत्रीदेखील मीच आहे.

पाहा काय म्हणालेत मुख्यमंत्री



देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक आम्ही युतीतच लढणार आहोत. याबाबत कार्यकर्त्यांच्या मनता कोणताही संभ्रम नको. कोणतीही जागा आपण गमावणार नाही. युतीतील जागावाटपात कोणतीही जागा आपल्याकडे येऊ शकते.