विरार : विरारमध्ये गुरुवारी एका हॉटेल व्यावसायिकाने स्वतःच्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. करुणाकरण पुत्रण असं 48 वर्षीय हॉटेल मालकाच नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांन सुसाईड नोट लिहली आहे. त्यात पैशासाठी त्रास देणाऱ्या हॉटेल मालकांची नावे लिहली आहेत. मात्र, कोरोना काळात डबघाईला आलेल्या नोकरदार वर्ग आणि व्यावसायिक कोणत्या मानसिक स्थितीत आहेत. याच ज्वलंत उदाहरण करुणाकरण आहेत.


सुसाईड नोट लिहून आत्महत्या
कोरोनाच्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. यात अनेकजण आता टोकाच पाउल उचलत आहे. विरार पश्चिमेकडील वाय. के. नगर परिसरात स्टार प्लॅनेट हॉटेलचे मालक करुणाकरण पुत्रण यांनी आपल्या हॉटेलमध्येच गळफास घेवून आपलं जीवन संपवलं आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना उजेडात आली. आत्महत्या करणार्‍यापूर्वी करुणाकरण यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. त्या सुसाईड नोटमध्ये हॉटेलचे मालक जितेंद्र पाटील आणि किशोर पाटील यांची नावे लिहली आहेत.


या कोरोनाकाळात करुणाकरणाचा हॉटेलचा धंदा मंदावला होता. त्यातच हॉटेलच भाडंही थकलं होतं. आठ लाखाच लाईटच बील बाकी होतं. त्यात हॉटेलचे मूळ मालक हे पैशासाठी वारंवार तगादा लावत होते. बुधवारी मयत करुणाकरण यांनी बारच्या परमिटची फी कशीतरी भरली होती. त्यात कोरानाकाळात धंदा मंद असल्याने पैशाची चणचण करुणाकरण यांना होती. आर्थिक त्रासालाच कंटाळून ही आत्महत्या केल्यानं. संपूर्ण हॉटेल व्यावसायिक हादरुन गेले आहेत. आता तरी सरकारला जाग येवून, हॉटेल व्यावसायिकांच्या वेदना समजून घ्याव्या अशी मागणी करत आहेत.


करुणाकरणची दोन लहान मुले आहेत. करुणाकरण यांच्या आत्महत्येमुळे सोसायटीतील सर्व नागरीक हादरले आहेत. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी आदराने बोलणारे करुणाकरण आपल्यात नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. अर्नाळा सागरी पोलिसात हॉटेलचे मालक जितेंद्र पाटील, किशोर पाटील यांच्या विरोधात करुणाकरण यांच्या पत्नी शालिनी पुञण यांनी तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. करुणाकरण यांच्या सुसाईड नोटच्या आधारे आता सर्व प्रकरणाची चौकशी करत आहेत.