मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत! पण काही बाबतीत आणखी तपशिलात जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोनामुळे राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसमोर, तसंच रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या अडचणीच्या काळात सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांची शासनाने त्वरित दखल घ्यायला हवी अशा मागणीचे संयुक्त पत्र विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं मुख्यमंत्र्यांना संयुक्तिक पत्र लिहलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवायचा असेल तर बाजार समित्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याची नितांत गरज असल्याचं पत्रात म्हटलंय. माथाडी कामगारांकडे ओळखपत्र आहेत. पण व्यापारी, वाहतूकदार आणि खरेदीदार हे बाजार समित्यांमध्ये येऊ शकतील, हे सुनिश्चित करावे लागेल. त्यासाठी त्यांना बाजार समितींच्या माध्यमातून ओळखपत्र द्यावे लागेल. बाजार समित्यांमध्ये थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, स्वच्छता यांची व्यवस्था केली, तरच त्यांना हिंमत येईल, असाही सल्ला पत्रातून देण्यात आलाय. वाहन चालक-वाहक यांना ओळखपत्र देतानाच त्या भागातील पोलिसांना सुद्धा तशा सूचना द्याव्या लागतील. सद्या बाजार समित्यांकडे येणारी वाहने अडवली जात आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या महानगरांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.

Coronavirus | शहरातून आलेल्या नागरिकांशी गावकऱ्यांनी माणुसकीनं वागा; आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं आवाहन

आम्ही तुमच्यासोबत आज संपूर्ण देश कोरोना सारख्या संकटाशी दोन हात करत आहे. या अशा परिस्थितीत आपण सर्वजण एकजुटीने उभेच आहोत. राज्यातील जनताही आपल्या परीने या परिस्थितीचा भक्कमपणे मुकाबला करत आहे. राज्य सरकारद्वारे घेतले जाणारे निर्णय, राबिविल्या जाणाऱ्या योजना यांना आमचे संपूर्ण समर्थन आहे. आज अनेक शहरे आपल्याला स्थितीचा मुकाबला करण्यासाठी बंद करावी लागत आहे. परिणामी अनेक समस्या उद्भवत आहेत. कोरोनाशी युद्ध करताना आपल्याला या समस्यांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळेच हे पत्र लिहित असल्याचं यात नमूद केलं आहे.

वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही : WHO

कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात शंभरीपार कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्यांचा आकडा आता वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 107 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यात मुंबईत सर्वाधिक 43 आहेत. तर, चार जणांचा मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत 11 जणांचा यात बळी गेलाय.

पिंपरी चिंचवड मनपा 12
पुणे मनपा 19
मुंबई शहर आणि उपनगर 43
नागपूर 4
नवी मुंबई 5
कल्याण 4
अहमदनगर 3
रायगड 1
ठाणे 2
उल्हासनगर 1
औरंगाबाद 1
पनवेल 1
वसई-विरार 1
रत्नागिरी 1
सांगली 4
सातारा 2

Coronavirus | Curfew in Maharashtra | संचारबंदी असतानाही डोंगरीतील लोक घराबाहेर