Hit and Run Case in Mumbai : मुंबईत (Mumbai News) एक भीषण अपघात (Accident News) झाला. चालकानं ब्रेक लावण्याऐवजी चुकून ऐक्सलेटर लावला आणि भीषण अपघात (Mumbai Accident News) झाला. या अपघातात 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील मुलुंड (Mulund News) परिसरात हा अपघात झाला आहे. 


मुंबईतील मुलुंड परिसरात भरधाव वेगात असलेल्या कारनं तुकाराम सावंत या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीला आणि स्कूटर चालकाला धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अपघातात झालेली दुखापत गंभीर असल्यानं तुकाराम सावंत यांचा मृत्यू झाला. तर स्कूटर चालकावर अद्याप उपचार सुरू आहेत. 


अपघातानंतर कार चालक कार घटनास्थळीच सोडून पळून गेला. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 279, 304 (अ), 337, 338 आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कार चालकाचा शोध सुरु केला. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी आरोपी अमरीश यादवला अटक केली. आरोपीनं दिलेल्या जबाबानुसार, ब्रेक लावण्याऐवजी गोंधळून चुकून एक्सलेटर दिल्यामुळे गाडीचा वेग वाढला आणि त्यातच हा अपघात झाला. अपघातानंतर घाबरुन गेल्यानं कार तिथच सोडू पळ काढल्याचंही चालकानं सांगितलं. दरम्यान, ालकाच्या चुकीची शिक्षा मात्र तुकाराम सावंत आणि त्यांच्या कुटुंबाला भोगावी लागली. तुकाराम सावंत यांच्या अपघाती निधनामुळे सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


चालकाचा ताबा सुटल्यानं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही अपघात 


मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस आयवेवर सकाळी चालकाचा ताबा सुटल्यानं दोन गाड्या पलटी होऊन अपघात झाला. ज्या दोन गाड्यांच्या अपघात झाला, त्यामध्ये वाहतूक विभागाच्या ACP (सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या) गाडीचा देखील समावेश होता. सहाय्यक पोलीस आयुक्तांना गाडी आणण्यासाठी जात असतानाच अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवानं अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दोन्ही गाड्यांमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पावसामुळे चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.