मुंबई : कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणारी तेजस एक्स्प्रेस आजपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. अगदी आरामदायक आणि जलद असणारी ही गाडी कोकणवासियांचा वेळ वाचवणार आहे. केवळ साडे आठ तासात मुंबई ते गोवा हा पल्ला गाठता येणार आहे. पण या ट्रेनच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांना 780 ते 2740 रुपये मोजावे लागणार आहेत. असे असतील तिकीट दरपत्रक

मार्ग

एसी चेअर (जेवणासह) एसी चेअर (जेवणाशिवाय) एक्झिक्युटिव्ह (जेवणासह)

एक्झिक्युटिव्ह (जेवणाशिवाय)

सीएसटी-रत्नागिरी

1940

1785

955

835

सीएसटी-कुडाळ

2495

2340

1200

1080

सीएसटी- करमाळी

2740

2585

1310

1185

दादर-रत्नागिरी

1915

1760

940

815

दादर-कुडाळ

2475

2320

1190

1070

दादर-करमाळी

2725

2570

1295

1175

ठाणे-रत्नागिरी

1820

1665

905

780

ठाणे-कुडाळ

2425

2270

1170

1050

ठाणे-करमाळी

2680

2575

1280

1155

  विशेष म्हणजे, रेल्वेने प्रवाशांसाठी खानपान सेवा नको असल्यास तिकीट काढताना त्यासाठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. पण जे प्रवासी गाडीत तशी मागणी करतील त्यांना अतिरिक्त 50 रु. भरावे लागणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज दुपारी 3.25 वाजता तेजस एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. त्यानंतर ही एक्स्प्रेस मुंबईतून निघून रात्री 12.35 वाजता करमाळीमध्ये पोहचणार आहे. 10 जून ते 31 ऑक्टोबरदरम्यान ही गाडी आठवड्यातून तीन वेळा आणि त्यानंतर आठवड्यातून पाचवेळा धावणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गाडीचं तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आहे. या गाडीला पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. रविवारी सकाळच्या सुमारास केवळ सहा तासांत पुढील चार महिन्यांतील हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या आधी 23 ऑगस्टच्या चक्क 600 तिकिटांचे आरक्षण झाले. संबंधित बातम्या

केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!

मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!