मुंबई: ‘मंजुळा शेट्ये यांचा मृत्यू अपघाती झाल्याचं दाखवून तुम्ही प्रकरण संपवू पाहताय का?’ असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला आहे.
दरम्यान, जेजे हॉस्पिटलचे डॉक्टर विश्वास रोकेला निलंबित केले गेलं नसल्याची धक्कादायक कबुली राज्य सरकारनं दिली. त्यावर निलंबन झालं नसेल तर मीडियासमोर निलंबित केल्याचं सांगण्याचा उद्देश्य काय? असंही हायकोर्टानं सरकारला विचारलं.
भायखळा तुरुंगात कैदी असणाऱ्या मंजुळा शेट्ये यांचा मृत्यू अत्याचारामुळे झाल्याचा आरोप आहे. मात्र सरकारची भूमिका ही आरोपींना पाठिशी घालण्याची दिसते आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे.
संबंधित बातम्या
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू
भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार
मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप
महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखल
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी हायकोर्टानं सरकारला झापलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2017 11:38 PM (IST)
‘मंजुळा शेट्ये यांचा मृत्यू अपघाती झाल्याचं दाखवून तुम्ही प्रकरण संपवू पाहताय का?’
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -