मुंबई : भाजप सरकारनं हेमा मालिनीच्या संस्थेला 70 कोटींचा भूखंड 1 लाख 75 हजार रुपयांत दिल, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींनी केला आहे. यांसदर्भात गलगलींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
हेमा मालिनी यांना 1976 च्या बाजारभावानं दिलेल्या भूखंडाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाल्याचा दावाही अनिल गलगली यांनी केला आहे.
भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनींच्या नाटय विहार केंद्रास फक्त 1 लाख 75 हजारात लाखात भूखंड बहाल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर या भूखंडासोबत 8 लाख 25 हजारांचा परतावा देखील सरकार देणार आहे. बाजारभावानुसार या भूखंडाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचा दावा अनिल गलगली यांनी केला आहे.
यापूर्वी हेमा मालिनी यांनी अंधेरी तालुक्यातील मौजे वर्सोवा येथील भूखंड दिनांक 4 एप्रिल 1997 रोजी दिला गेला होता. त्यासाठी हेमा मालिनींच्या संस्थेनं 10 लाखांचा भरणा केला. पण त्यातील काही भाग हा सीआरझेडमुळे बाधित होत असल्यामुळं हेमा मालिनींनी कुठलंही बांधकाम केलं नाही.
उलट तिवरांची कत्तल केली होती. भाजपा सरकारनं याबाबीकडे दुर्लक्ष केलं आणि हेमा मालिनीच्या संस्थेस पर्यायी भूखंड वितरित केल्याचा आऱोप गलगली यांनी केला आहे.