Mumbai Rain: मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच या पावासाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशीराने सुरु आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल 15 मिनीटाने तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनीट उशिराने सुरु आहे.
अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी
सकाळपासून मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूरपासून सायनपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यात काही रुग्णवाहिका देखील अडकल्या आहेत. तर अर्धा तासाचे अंतर कापण्यासाठी सुमारे तास दोन तासांचा वेळ लागत आहे. त्यामुळं मुंबईकरांनी चेंबूरपासून मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करणं गरजेचे आहे. मुंबईत काही सखळ भागांमध्ये पाणी साचलेले आहे. मुंबईतील अंधेरी एस वी रोड परिसरात देखील पाणी साचलेलं आहे. त्यामुळं वाहतूक संथ गतीने सुरु आहे. चाकरमनी या पावसातून वाट काढत आपल्या कार्यालयाकडं जाताना आपल्याला पाहायला मिळतायेत. सकाळी अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळं अंधेरी सबवे वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर अर्धा तासाने अंधेरी सब वे वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे.
नवी मुंबईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुसळधार पाऊस लागून नसल्यानं पाणी साचण्याच्या घटना नाहीत. सध्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरात संपुर्ण ढगाळ वातावरण आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून पावसाची संततदार सुरुच असून काल दुपारनंतर हलका झालेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर पकडला आहे.
पालघर जिल्ह्यात नदी-नाले दुथडी
आज पहाटेपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. यामुळं सर्वच भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. नदी-नाले दुथडी भरुन वाहायला सुरुवात झाली आहे. तर वसई-विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे. गेल्या काही दिवस पडत असलेल्या पावसामुळं काही शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या होत्या. मात्र, आता सतत पडत असलेल्या पावसामुळं या पेरण्याही खोळंबलेल्या आहेत.
राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी
राज्याच्या काही भागात पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे, तर कुठे अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दे्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: