मुंबई : मुंबई पूर्व उपनगरांत पावसाचा जोर वाढला असून, भांडूप आणि कांजुर मार्गदरम्यान रेल्वे रुळावर पाणी आलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिट उशिराने होत आहे.
काल मध्यरात्रीपासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भांडूप ते कांजुर मार्गदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्याने, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिट उशाराने सुरु आहे.
मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर भागात मुसळधार पाऊस बरसतोय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, लोकलची वाहतूक उशिराने होत असल्याने कामानिमित्त मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.
दुसरीकडे रायगड, पालघर, नागपूर आदी ठिकाणीही पावसाने बऱ्याच दिवसानंतर दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथे पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसाच्या पाण्यामुळं गावातल्या गल्लींमध्ये कंबरेएवढं पाणी साचलंय.
भांडूप ते कांजुरमार्गदरम्यान रेल्वे रुळावर पाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2017 10:42 AM (IST)
काल मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून, पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भांडूप ते कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिराने सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -