मुंबई, उपनगरात पावसाची संततधार, अंधेरी-सायनमध्ये पाणी साचलं
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 05:39 PM (IST)
मुंबई : मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहरात संध्याकाळीही ठिकठिकाणी पाऊस झाला. सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. शिवाय अंधेरी आणि सायनमध्ये पाणी साचल्यानं वाहतूकही धीम्या गतीने सुरु होती. त्यामुळे संध्याकाळी ऑफिसहून सुटलेल्या चाकरमान्यांना घरी पोहचण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात कालपासूनच वरुणराजाची कृपा कायम आहे. येत्या काही तासात मुंबईत जोरदार पाऊस सुरुच राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत सकाळी 8 ते रात्री 8.30 पर्यंत पडलेला पाऊस कुलाबा - 220 मिमी सांताक्रुझ - 57.9 मिमी मुंबई शहर - 56.75 मिमी पूर्व उपनगर - 53.41 मिमी पश्चिम उपनगर - 42.54 मिमी