कल्याण : मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. या पावसामुळे कल्याण-नगर मार्गावरील रायता गावाजवळच्या उल्हास नदीने रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की, नदीवरील धरणाची भिंत फुटून पाणी आसपासच्या गावांमध्ये शिरलं आहे.


कल्याणमधील रायता गावातही नदीचं पाणी शिरलं. गावातील एका गोठ्यात 23 गायी बांधल्या होत्या. पाणी गोठ्यात शिरल्यानंतर या गायी सुटण्यासाठी त्या आटापिटा करत होत्या. काही गायींची दावणी तुटली, त्या गायी छतावर गेल्या. तर काही गायींचा गोठ्यातच बुडून मृत्यू झाला. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, ज्या गायी छतावर गेल्या होत्या. त्या गायींचादेखील बूडून मृत्यू झाला आहे.