Harvinder Singh Sandhu:  मुंबईमध्ये 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या (mumbai terror attack) आठवणी आजही ताज्या आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 मध्येही मुंबईमध्ये दहशतवादी (mumbai terror attack) हल्ला झाला होता. मुंबईमध्ये झालेल्या दहशतावादी हल्ल्याच्या या घटना आठवल्या तरी आजही भीतीने अंगावर काटा येतो. या हल्ल्यांच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. या कटू आठवणी मनातून जात नाहीत. तोवर अशाच एका हल्ल्याचा दहशतवाद्यांनी कट आखला होता. आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह संघु उर्फ रिंदाच्या दहशतवादी मॉड्यूलच्या आधारे हल्ल्याचा कट आखण्यात आल्याचं समोर आलं. मात्र महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब अँटी गँगस्टर स्कॉडने या दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला. आणि तीन संशयित दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 


कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंह संघु उर्फ रिंदाने महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याचा कट रचण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आलीय. कल्याण येथे पंजाब ॲन्टी गँगस्टर स्क्वॉड आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आलीय. या तीनही संशयित दहशतवाद्यांच्या कबुलीजबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पंजाबमधील कुख्यात गॅंगस्टर सोनू खत्री अमेरीकेत आहे. तो बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदाचा साथीदार होता. रिंदाचा ड्रग्ज ओव्हरडोसमुळे पाकिस्तानात मृत्यू झाल्यानंतर खत्री यानं त्याचा धंदा आपल्या ताब्यात घेतला. सोनू खत्रीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात घातपाताचा डाव आखल्याची कबुली या तिघांनी दिली आहे. हल्ल्याच्या सूचना काही दिवसांतच या तिघांना मिळणार होत्या, पण त्याआधीच त्यांच्या हाती बेड्या पडल्या. 


सहा महिन्यात सोनू खत्रीने संशयित आरोपींना पाच ते सहा लाख ट्रान्सफर केले. अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या संपर्कात खत्री असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीमेपलीकडून मिळणाऱ्या शस्त्रांच्या आधारे खत्री दहशत पसरवतो. महाराष्ट्रात यापुर्वीही अनेकदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. आता पुन्हा अशाच एका हल्ल्याचा कट आखला जात होता. मात्र हा हल्ला घडवण्यामागे काय उद्देश होता? कोणाच्या सांगण्यावरुन सोनू खत्री महाराष्ट्रावर हल्ला करण्याचा डाव आखत होता?
हे शोधण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर असणार आहे.  




इतर महत्वाच्या बातम्या