मुंबई: ऐन कार्यालयीन वेळी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. चेंबूरजवळ क्रॉसिंग पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक रखडली आहे. सकाळी 8 च्या सुमारास हा बिघाड झाल्याने साडे नऊपर्यंत वाहतूक ठप्प झाली. मात्र बिघाड दुरुस्त झाला असला तरी हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे.