मुंबई :हार्बर रेल्वे (Harbour Line) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेतील हार्बर मार्गावर आज पुन्हा रिकामी लोकल घसरली आहे. हार्बर लाईनवर सोमवारी लोकलचा एक डबा घसरल्याची दुर्घटना घडली होती. त्याच ठिकाणी दुरुस्तीनंतर आज पुन्हा रिकामी लोकल चालवण्यात आली होती. मात्र, सोमवारी रेल्वेचा डबा घसरला, त्याच ठिकाणी पुन्हा रेल्वेचा डबा घसरल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.


दुर्घटना झाली, त्याच ठिकाणी लोकल पुन्हा घसरली


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सीएसएमटी स्थानकात ज्या ठिकाणी लोकल घसरली, त्याच ठिकाणी आज ब्लॉक घेऊन चाचणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी असलेल्या एका पॉईंटवर दुरुस्ती करून पुन्हा एकदा रिकामी लोकल चालवण्यात आली. पण ही रिकामी लोकल देखील पुन्हा त्याच ठिकाणी घसरली. या लोकलचा एक डबा घसरला आहे, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही लोकल पूर्णतः रिकामी होती. लोकल पुन्हा त्याच ठिकाणी घसरल्यामुळे पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. जोपर्यंत ही घसरलेली रिकामी लोकल पुन्हा एकदा रुळांवर आणत नाही तोपर्यंत वाहतूक बंद असेल, असंही रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.


रिकामी लोकल पुन्हा घसरली


या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर दुर्घटना घडली होती. पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरुन घसरला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ पनवेल लोकलचा एक डबा रुळावरुन घसरला होती. यामुळे हार्बर लाईनवरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. वडाळा ते सीएसएमटी दोन्ही बाजूची वाहतूक काळी वेळासाठी ठप्प झाली होती. आज त्याच ठिकाणी रिकामी लोकल चालवण्यात आली, पण पुन्हा दुर्घटना झाली त्याच ठिकाणी लोकलचा डबा घसरला. यामुळे पुन्हा एकद हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे.


हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प


29 एप्रिल रोजी हार्बर लाईनवर जिथे लोकल डबा घसरला होता. त्यानंतर आज दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला. दुरुस्तीनंतर पुन्हा त्याच मार्गावरुन रिकामी लोकल चालवण्यात आली. मात्र, चाचणीसाठी असलेली ही लोकल सुद्ध पुन्हा घसरली आहे. दोन दिवसात लोकल घसरल्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ढिसाळ काम केलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लोकलचा डबा घसरला, हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत