मुंबई : दिवसाढवळ्या मुंबईच्या घाटकोपर परिसरात गोळ्या घालून एका स्थानिकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बबलू दुबे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून घाटकोपरमधील गोळीबार रोड परिसरात ही घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बबलू दुबे हा गोळीबार रोड परिसरात त्याच्या गाडीजवळ बसला होता. तीन इसम एका रिक्षातून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बबलूवर बंदूकीने तीन राऊंड फायर केले. तसेच त्याच्यावर चाकूने वारदेखील केले. हल्ल्यानंतर तीनही मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला. हल्लेखोर तिथून पळाल्यानंतर त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी दुबे याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दुबेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. बबलूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. CCTV VIDEO | टिळक नगर रेल्वेस्टेशनवर सुरक्षा बलाच्या जवानाला बेदम मारहाण संबधित बातम्या  टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला बेदम मारहाण बिल्डर हत्या प्रकरणात 16 वर्षांपासून फरार, छोटा राजनच्या हस्तकाला बेड्या डोंबिवलीच्या कोपर रेल्वे स्थानकात टीसीला मारहाण, उद्दाम प्रवाशाला बेड्या कामगारांकडून मालकाचे अपहरण करुन हत्या