नवी मुंबई: तब्बल 327 गायकांनी एका वेळेस वेगवेगळे शब्द उच्चारत गाणे गात गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला.
जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे.
विराग वानखेडे यांनी हा चित्रपट बनवला आहे. 'डॉ. तात्या लहाने, अंगार' असं या चित्रपटाचं नाव आहे.
या सिनेमाच्या टायटल साँगवर हे समूह गीत गात, वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. नवी मुंबईतील गायक विराग वानखेडे यांनी 327 गायकांना एकत्र घेऊन हा विक्रम रचला. यापूर्वी 296 गायकांनी एकत्र गात रेकॉर्ड केला होता.
एकाच वेळी सर्वांनी गाणे न गाता गाण्यातील एक एक शब्द प्रत्येकाने गायचा होता. गाण्यामध्ये 109 शब्द होते. हे आव्हान यशस्वीरित्या गायकांनी पार पाडले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून गायक या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी निवडण्यात आले होते. विराग वानखेडे यांच्या नावावर आधी तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्यामध्ये या विक्रमाची भर पडली आहे.
तात्याराव लहाने हे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून परिचीत आहेत. त्यांनी 2 लाखांवर अधिक नेत्र शस्त्रक्रिया करुन, अनेक गोरगरिबांना दृष्टी दिली आहे. त्यामुळेच तात्यांचं हे काम मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न विराग वानखेडे यांनी केला आहे.
327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2017 10:47 AM (IST)
एकाच वेळी सर्वांनी गाणे न गाता गाण्यातील एक एक शब्द प्रत्येकाने गायचा होता. गाण्यामध्ये 109 शब्द होते. हे आव्हान यशस्वीरित्या गायकांनी पार पाडले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -