सुधाकर शिंदेंना सरकारचं अभय, अविश्वास प्रस्ताव निलंबित
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 12 Apr 2018 06:53 PM (IST)
सुधाकर शिंदे यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव राज्य शासनाने निलंबित केला आहे. सुधाकर शिंदे यांची बदली होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी भाजपने आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव राज्य शासनाने निलंबित केला आहे. सुधाकर शिंदे यांची बदली होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी हा धक्का मानला जात आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन दीड वर्ष झालं आहे. पहिले आयुक्त म्हणून सुधाकर शिंदे यांची वर्णी लागली. पण महापालिकेत बहुमतात असलेल्या भाजप नगरसेवक आणि आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पटेनासं झालं होतं. आयुक्त कोणत्याच प्रकारची नागरी कामं करत नसल्याचा आक्षेप सत्ताधारी भाजपाने घेतला. कचरा प्रश्न, पाणी, सार्वजनिक भूखंड, मैदानं या महत्वाच्या कामात आयुक्तांना अपयश आल्याचं कारण देत भाजपाने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. भाजपाच्या 50 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने तर शेकाप आघाडीच्या 22 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. संबंधित बातम्या :