मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. काही वेळात कर्मचारी संघटना याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.


सरकारसोबतच्या चर्चेतून अखेर ही कोंडी फुटली आहे. आजच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचे आवाहन सरकारने केले होते. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला.


सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मागीत तीन दिवसांपासून संपावर होते. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांनी हा संप पुकारला होता. या संपात राज्यातील एकूण 17 लाख कर्मचारी सहभागी झाले होते.


सरकारी कंपन्यांच्या मागण्या
सातव्या वेतन आयोगाचा लाभ 1 जानेवारीपासून नव्हे तर तात्काळ लागू करा, पाच दिवसांचा आठवडा, जुन्या निवृत्तीवेतन योजनेचे पुनरुज्जीवन या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी कालपासून तीन दिवस संपावर गेले होते. संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.


संबंधित बातम्या


सरकारी संपाचा रुग्णांना फटका


17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवसीय संपावर


राज्य सरकारच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई


राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 14 महिन्यांचा थकित महागाई भत्ता