निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीच्या दरात घसरण!
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2019 03:09 PM (IST)
सध्या लग्नसराईचा मोसम असल्यामुळे सोन्याचांदीची मागणी वाढल्याने खरेदीवर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. मात्र, येत्या काही दिवसांत पुन्हा सोन्याचे भाव वधारु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबई : सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? मग लग्नसराईचा हा मुहूर्त चुकवू नका. कारण सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. महिन्याभरात सोन्याचे दर दोन हजार रुपयांनी घसरले आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्याने सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे. महिनाभरात सोन्याचा दर प्रति तोळा दोन हजार रुपयांनी कमी होऊन ते 34 ते 35 हजारांवरुन 32 हजारांवर आला आहे. VIDEO | महिन्याभरात सोन्याचे दर प्रतितोळा 2 हजारांनी घसरले | मुंबई | एबीपी माझा दुसरीकडे चांदीचा दरही कमी झाला आहे. महिन्याभरात चांदीच्या दरात प्रति किलो अडीच हजारांनी घसरण झाली आहे. चांदीचा प्रति किलो 41 हजार 500 रुपयांवरुन 39 हजार रुपयांवर पोहोचला आहे. सध्या लग्नसराईचा मोसम असल्यामुळे सोन्याचांदीची मागणी वाढल्याने खरेदीवर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. मात्र, येत्या काही दिवसांत पुन्हा सोन्याचे भाव वधारु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.