मुंबई : साकीनाका परिसरात 9 वर्षीय मुलीवर 65 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष नगर भागात ही घटना घडली.
मोहम्मद हुसेन पटेल असे या 65 वर्षीय आरोपीचे नाव असून, तो कचरा वेचण्याचे काम करतो.
सात दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीबरोबर मोहम्मदने दुष्कृत्य केले. यानंतर आरोपीने त्याच्या मूळ गावी म्हणजे सोलापुरात पळ काढला होता.
या दरम्यान अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीने घडलेला प्रकार पीडित मुलीच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
साकीनाक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुंबईत 9 वर्षीय मुलीवर 65 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Nov 2017 07:21 PM (IST)
सात दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीबरोबर मोहम्मदने दुष्कृत्य केले. यानंतर आरोपीने त्याच्या मूळ गावी म्हणजे सोलापुरात पळ काढला होता.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -