Continues below advertisement

मुंबई : घाटकोपर येथे भाजप आमदारांकडून एका रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी आमदार पराग शाह (Parag Shah) यांनी एका रिक्षा चालकाला कानशिलात लगावली असून त्यास शिवीगाळ केल्याचंही व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार तसेच अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग शाह यांनी घाटकोपर येथे आंदोलन केलं होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.

जर रिक्षा चालकाने नियम मोडला असेल तरी आमदाराने कायदा हातात घेण्याचे अधिकार आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. काही लोकांनी पराग शाहांच्या या कृत्याचं कौतुक केलं असलं तरी आमदारांना कायदा हातात घेऊन रिक्षा चालकाला मारहाण करणं योग्य आहे का असा सवाल विचारला जात आहे.

Continues below advertisement

Parag Shah Video : रिक्षा चालकाला मारहाण

मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. वल्लभबाग लेन आणि खौगली भागात अनेक दुकानदारांनी पदपथावर खुर्च्या आणि बाकडे ठेवून अतिक्रमण केलं होतं. त्यानंतर भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी या भागाला भेट दिली.

पराग शाहांच्या या भेटीदरम्यान, महात्मा गांधी मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत, चुकीच्या दिशेने गाडी चालवत एक रिक्षा चालक आला. त्या वेळी पराग शाह यांनी त्या रिक्षा चालकाला मारहाण केली.

ही बातमी वाचा: