मुंबई : घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. परंतु यामधील दिलासादायक बाब म्हणजे राजेश दोशी नावाच्या व्यक्तीला सुमारे 15 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. राजेश दोशी यांना जवळच्याच शांतीनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

राजेश दोशी यांनी ढिगाऱ्यातून अडकलेल्या अवस्थेत असतानाही मुलाशी फोनवरुन संपर्क साधला आणि आपण जिवंत असल्याचं सांगितलं. त्यांच्या मुलाने ही माहिती प्रशासनाला कळवली. त्यानंतर रात्री दीड वाजता एनडीआरएफच्या जवानांनी महत्प्रयत्नाने दोशींना बाहेर काढलं.

दरम्यान, राजेश दोशींच्या पायाचं काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाल्याने प्लॅस्टर होतं. ज्या पायाला प्लॅस्टर होतं, तोच पाय ढिगाऱ्यात अडकला होता. त्यामुळे दोशींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि अग्निशमनच्या जवानांना फार मेहनत घ्यावी लागली. 15 तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ते सुखरुप बाहेर आले.

संबंधित बातम्या

घाटकोपर इमारत दुर्घटना : शिवसेनेच्या सुनील शितपला अटक

इमारत दुर्घटना : पत्नी आयसीयूत, चिमुरडी गमावली, आईचा पत्ता नाही

LIVE : घाटकोपर इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली, 5 जणांचा मृत्यू