मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 17 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभाग समित्यांची निवडणूक पार पडली. यामध्ये ए, बी आणि ई प्रभागामध्ये भाजप पुरस्कृत अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी विजयी झाल्या. गीता गवळी यांना शिवसेनेनंही पाठिंबा दिला. इतर प्रभाग समित्यांवर शिवसेना, भाजपच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली. मुंबई महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप कडून उमेदवार देण्यात आले होते. या आठपैकी चार प्रभागात भाजपने, तीन प्रभागात शिवसेनेने, तर एका प्रभागात अखिल भारतीय सेनेचा अध्यक्ष बनला आहे. मुंबई महापालिकेत सत्तेत नसणाऱ्या भाजपची छुपी युती पुन्हा एकदा पालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत पहिला मिळाली. तर शिवसेनेनेही महापौर निवडणुकीत भाजपने त्यांना केलेल्या मदतीची परतफेड या प्रभाग समिती निवडणुकीत मदत केली. कोणत्या प्रभागात कोणाचा विजय? ए , बी आणि इ - गीता गवळी  ( अभासे ) सी आणि डी - ज्योत्सना मेहता ( भाजप ) एफ दक्षिण आणि एफ उत्तर - प्रल्हाद ठोंबरे ( शिवसेना ) जी दक्षिण - आशिष चेंबुरकर ( शिवसेना ) पी दक्षिण - राजुल देसाई ( भाजप ) पी उत्तर - दक्षा पटेल  ( भाजप ) आर दक्षिण - कमलेश यादव  ( भाजप ) आर उत्तर आणि आर मध्य - शीतल म्हात्रे ( शिवसेना )