डोंबिवली : डोंबिवलीच्या उमेश नगर परिसरात गॅस सिलेंडरचे स्फोट (Gas cylinder blast in Dombivali) असल्याची माहिती समोर येत आहे. या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहती समोर आली आहे. स्फोटात जखमी झालेल्या या व्यक्तीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यावेळी घरात कुणी नव्हते मात्र या स्फोटात घराचे नुकसान झाले आहे. दरम्यान जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंत मोरे असे जखमीचे नाव असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
डोंबिवली पश्चिम येथील उमेश नगर परिसरात राहणारे हनुमंत मोरे हे घरात एकटे राहतात. सकाळी गॅसचा वास येत असल्याने ते गॅस जवळ तपासणी करण्यासाठी गेले. तपासणी करत असताना त्यांनी गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला. गॅस पेटवताच अचानक स्फोट झाला. मोरे यांना मुंबईच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .या स्फोटात घराचे पत्रे तुटून उडाले तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले आहे . या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून स्फोटच नेमकं कारण काय आहे याचा शोध पोलीस करत आहे.
गॅस वापरताना काळजी घ्या...
घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा.
इतर बातम्या :