मुंबई : मुंबईत आलात आणि तुम्ही नवीन असाल तर काही रिक्षाचालक किंवा टॅक्सी चालक तुमची हमखास लूट करतात. अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात किंवा लांब मार्गाने नेऊन जास्तीस्त जास्त पैसे तुमच्याकडून वसूल करण्याचा प्रयत्न करतात. पण मुंबईतल्या पश्चिम उपनगरात मात्र गेल्या काही दिवसापासून रिक्षा चालकांनाच लुटणारी टोळी कार्यरत होती या टोळीला आरे पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या टोळीत एका महिलेचाही समावेश आहे.
ही टोळी विशेषतः रात्रीच्या वेळी कार्यरत असते.मुंबईत रात्री मुख्य मार्गावर बेस्ट बस सेवा सुरू असते त्यामुळे आतल्या भागात जायचे असल्यास रिक्षा किंवा टॅक्सीचा पर्याय प्रवाशांना नसतो. याचा फायदा काही रिक्षाचालक उचलताना दिसत आहे. एक रिक्षाचालक रात्रीच्या वेळी गोरेगाव च्या आरे कॉलनीत प्रवाश्याची वाट पाहत उभा असतांना त्या ठिकाणी अम्मा बबलू यादव (19 वर्षे) निलेश यादव ( 22 वर्षे) आणि महिला कांचन थोरवे वय (22 वर्षे) हे रिक्षा चालक संजीत कुमार यांना रिक्षाचालकाजवळ सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या मयूर नगरला सोडण्यास सांगीतले आणि रिक्षात बसले.
आरेचा जंगल रस्ता जास्त वाहने नसल्याने सुनसान होता. थोडं दूर गेल्यावर या आरोपीना रिक्षा चालकास मारहाण करून त्याच्याजवळ असलेला मोबाईल आणि नगदी 800 लुटून फरार झाले .रिक्षा चालकाने ताबडतोब आरे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली पोलिसांनीही लगेच कारवाही करत 4 आरोपीना अटक केली अशी माहिती या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक नूतन पवार यांनी दिली.