Devendra Fadnavis : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) कोकणात (konkan) जाण्याची लगबग सध्या चाकरमान्यांची सुरु आहे. मुंबई भाजपच्या (Mumbai Bjp) वतीने चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी तीन दिवस सहा विशेष 'नमो एक्सप्रेस'ची ( Namo Express) व्यवस्था केली आहे. रात्री दादर येथून कोकणात रवाना झालेल्या या ट्रेनला उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis_ यांनी भगवा झेंडा दाखवला. यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
कोकणात जाणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सहा ट्रेन आणि 338 बस
गणेशोत्सवानिमीत्त कोकणात जाणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सहा ट्रेन आणि 338 बस आम्ही सोडल्या आहेत. आशिष शेलार आणि लोढा यांनी पुढाकार घेऊन व्यवस्था केली आहे. लोकांमधे उत्साह असल्याचे फडणवीस म्हणाले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी भाजप दरवर्षीच जास्तीची व्यवस्था करत असते. भाजपला आशीर्वाद मिळत आहे, याचबरोबर आम्ही स्पर्धा भरवत असतो. यात तीन हजार एंट्री आल्या आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फडणवीस म्हणाले. टोल माफी कोकणवासीयांसाठी केली आहे. गोवा हाय वे वर रवींद्र चव्हाण गेले पंचवीस दिवस त्या ठिकाणी आहेत. देशभरातून मशीन आणल्या आहेत. सर्व कंत्राटदारांची मदत करुन काम सुरु केल्याचे फडणवीस म्हणाले.
आम्ही शासकिय विश्रामगृहात राहतो तिकडेच रहाणार
छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीबाबत देखील फडणवीसांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेऊ. काही कामं झाली आहेत, तर काही कामं पाईपलाईनमध्ये आहेत. प्रश्न विचारतात त्यांना प्रतिप्रश्न आहे की तुम्ही अडीच वर्ष काय केले माश्या मारल्यात का? असा सवाल करत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. दरम्यान, फाइव्ह स्टार हॉटेलबाबत मला माहीत नाही. आम्ही शासकिय विश्रामगृहात राहतो तिकडेच रहाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या:
Pune Ganeshotsav 2023 : पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला घडवा मेट्रोसफर; वाहतूक कोंडीला विसरा अन् थेट मेट्रोमधून घरी गणपती आणा...