मिरारोडमध्ये रात्री दोन वाजता गोळ्या झाडून फळविक्रेत्याची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2017 07:38 AM (IST)
मिरारोड: मुंबईजवळच्या काशीमिरातील मीरा गावात एका फळ विक्रेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शामू गौडा असं या फळविक्रेत्याचं नाव आहे. काही अज्ञातांनी रात्री उशिरा शामूच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला असता बाईकवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि निघून गेले. गोळीबारात शामूचा मृत्यू झाला. एका हॉटेलबाहेर फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शामूची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पोलिसांनी हत्येच्या उलघडेसाठी विशेष पथक तयार केलं आहे. दरम्यान, हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.