मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या पहिल्या पानावरील जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातीत मुख्यमंत्री दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत पहिल्या रांगेत दिसत आहेत. शिवसेनेचे इतर मोठे नेते मात्र दुसऱ्या रांगेत आहेत.


या जाहिरातीच्या माध्यमातून शिवसेना-भाजप युतीत मुख्यमंत्र्यांचं महत्व आणि ठाकरेंसह विशेषतः मिलिंद नार्वेकर यांच्याशी असलेली जवळीक पुन्हा अधोरेखित झाली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना मात्र या जाहिरातीत दुय्यम स्थान दिल्याने शिवसैनिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.


Raj Thackeray | काय सांगतात राज ठाकरेंचे ग्रहतारे? | ग्रहताऱ्यांच्या गल्लीतून दिल्ली | ABP Majha


यापूर्वी शिवसेनेच्या बॅनरवर कधीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरीने इतर पक्षाच्या नेत्याचा फोटो लावण्यात आलेला नाही, ते शिवसेनेच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. मात्र आज पहिल्यांदाच प्रोटोकॉल मोडत शिवसेनेनं पक्षाबाहेरील नेत्याला आपल्या बॅनरवर उघडपणे स्थान दिलं आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा युती फक्त लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादीत न राहता विधानसभा निवडणुकीनंतरही अभेद्य असेल, असे संकेतच मिळत असल्याची चर्चा रंगलीय.


लोकसभा निवडणुकीआधी सामनातून भाजपवर टीकेची एकही संधी सोडली जात नव्हती. मात्र या जाहिरातीमुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेना-भाजप युती अभेद्य राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


VIDEO : बातम्या सुपरफास्ट | राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा