मुंबई : पावसाळा सुरु झाला की झाड कोसळण्याच्या घटना समोर येतात. दादरमध्ये अशाच एका घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेना भवनजवळच्या स्वामी समर्थ मठाजवळ ही घटना घडली.
दहीसरमध्येही काल रात्री एका 14 वर्षीय मुलीचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला होता. दहीसरमधील एस. एन. दुबे या रोडवर दृष्टी मुंगरा या मुलीचा झाड अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला.
मुंबईतील झाड कोसळून मृत्यू होण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड पडून मृत्यू झाला होता.
या घटनांमुळे मुंबईतल्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील विविध भागात झाड कोसळून गाड्यांचं नुकसान झाल्याचंही काल समोर आलं होतं. त्यामुळे जीर्ण आणि जुन्या झाडांमुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
झाड पडून मृत्यू झालेल्या घटना
22 जुलै 2017 - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू
23 जुलै 2017 – किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू
7 डिसेंबर 2017 – शारदा घोडेस्वार – डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू
19 एप्रिल 2018 – दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू
9 जून 2018 - दहीसरमधील एस. एन. दुबे या रोडवर दृष्टी मुंगरा या मुलीचा झाड अंगावर झाड कोसळून मृत्यू
शिवसेना भवनजवळ झाड अंगावर कोसळून चार जण जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2018 04:23 PM (IST)
दादरमध्ये अशाच एका घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेना भवनजवळच्या स्वामी समर्थ मठाजवळ ही घटना घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -