भिवंडी : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या केल्याची संतापजनक घटना भिवंडीतल्या सरवली गावात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा नराधम पीडित मुलीचा सख्खा चुलत भाऊ आहे. चिमुकली घराबाहेर खेळत असताना या नराधमानं तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केली. मुलगी रात्री घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सकाळच्या सुमारास सरवली गावात पीडित मुलगी रहात असलेल्या घरा पासून पाचशे मीटर अंतरावर पाईप लाईनच्या खाली पीडित मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने संपुर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असतानाच स्थानिक कोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असता पीडित बलिकेवर बलात्कार करुन तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
कोनगाव पोलिसांनी सुरवातीला अज्ञात आरोपींच्या विरोधात अपहरण बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करतात या आरोपींचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली असता पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांसोबत गुन्हे शाखा यांनी या गुन्ह्याचा तपास गांभीर्याने करण्यास सुरुवात केली .
आरोपी जवळचाच असेल या निष्कर्षावरुन पोलिसांनी पीडितेच्या 13 वर्षाच्या सख्या चुलत भावास ताब्यात घेतलं. पोलिसांनी विश्वासाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे . या विधीसंघर्ष ग्रस्त बालका विरोधात पीडितेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी बालन्यायालायत हजर केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी दिली आहे .
भिवंडीत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सख्खा चुलत भावास अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2019 11:39 PM (IST)
आरोपी जवळचाच असेल या निष्कर्षावरुन पोलिसांनी पीडितेच्या 13 वर्षाच्या सख्या चुलत भावास ताब्यात घेतलं. पोलिसांनी विश्वासाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -