नालासोपारा : नालासोपाऱ्यातील कलंब समुद्रकिनाऱ्यावर बुडालेले पाचही जणांचे मृतदेह मिळाले आहेत. वसईतील दोन कुटुंबातील पाच जण बुडाले होते. 5 जणांपैकी सायंकाळी उशिरा एकाचा मृतदेह सापडला होता. रात्रभर शोधमोहीम केल्यानंतर मध्यरात्री दोघांचे आणि आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले आहे. कांचन गुप्ता, शीतल गुप्ता, नीशा मौर्या आणि प्रिया मौर्या यांचे मृतदेह सापडले आहेत.
नालासोपारा पश्चिमेकडील कलंब समुद्रकिनारी दोन कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. धुळवडीचा आनंद लुटून झाल्यावर वसईतील गोकुलपार्क या इमारतीमध्ये राहणारे मौर्या आणि गुप्ता या दोन कुटुंबातील सात जण कलंब समुद्रकिनारी पोहण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते.
मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही कुटुंबातील पाच जण बुडाले होते. स्थानिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी झाले. यानंतर स्थानिक गावकरी, पोलीस प्रशासन आणि वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम सुरु केली.
मृतकांची नावे
1. निशा कमलेश मौर्या
2. प्रशांत कमलेश मौर्या
3. प्रिया कमलेश मौर्या
4. कंचन दिनेश गुप्ता
5. शितल मुकेश गुप्ता
नालासोपारात समुद्रकिनारी बुडालेल्या पाचही जणांचे मृतदेह सापडले, रात्रभर शोधमोहीम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2019 09:44 AM (IST)
धुळवडीचा आनंद लुटून झाल्यावर वसईतील गोकुलपार्क या इमारतीमध्ये राहणारे मौर्या आणि गुप्ता या दोन कुटुंबातील सात जण कलंब समुद्रकिनारी पोहण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -