VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक!
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2016 04:04 PM (IST)
मुंबई : येत्या 24 डिसेंबरला संपूर्ण मुंबईनगरी ही शिवमय होणार आहे. कारण, शिवस्मारक भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने मेगा प्लॅन तयार केला आहे. ठिकठिकाणी बॅनर तर दिसतीलच, त्याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या शिवकालीन प्रतिकृतीही 24 तारखेला मुंबईत दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 तारखेला अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यासह राजघराण्यातील मंडळी आणि इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान अरबी समुद्रात उभारण्यात येणार शिवस्मारक कसं असेल याची पहिली झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पाहा व्हिडीओ