मुंबई : मुंबईत 24 डिसेंबरला होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमीपूजनाची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. 23 तारखेला राज्यातून आलेली माती आणि पाणी यांचा कलश फ्लोटवर ठेवण्यात येईल. या फ्लोटसोबत सकाळी चेंबूरमधील शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून शोभायात्रेची सुरुवात होणार आहे.
फ्लोट आणि शोभायात्रा सायन, लालबाग, गिरगाव चौपाटी असा प्रवास करत गेट वे ऑफ इंडियाला पोहोचणार. त्यानंतर गेट वे ऑफ इंडियावर उभारलेल्या भव्य स्टेजवर हा कलश, माती आणि पाणी सोपवलं जाईल. हेच पाणी आणि माती मुख्यमंत्री 24 डिसेंबरला पंतप्रधानांना देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार आहे.
शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी शिवकालीन वातावरण निर्मिती करण्यासाठी सरकारनं नितीन देसाईकडून मेघडंबरी किल्ल्याचा देखावा साकारला आहे.
"छत्रपतींचा आशिर्वाद, चला मोदींना देऊ साथ" हे भाजपचं घोषवाक्य असलं तरी हा कार्यक्रम सरकारचा आहे. पक्षाचा नाही, त्यामुळे शक्ती प्रदर्शनाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं आहे.