मुंबई: गजबजलेल्या दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार करुन एकाची हत्या करण्यात आली आहे. मनोज मौर्या असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दादर फूल मार्केटमध्ये सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
दुचाकीवरुन आलेल्या मारेकऱ्यानी मनोज मौर्या यांच्यावर गोळी झाड़ली. या गोळीबारात मौर्या जागीच ठार झाले. सध्या पोलिसांनी हत्या झालं ते ठिकाण बॅरिकेट लावून बंद केलं आहे. पोलिसांकड़ून तपास सुरु, मौर्या हे फूल मार्केट परिसरात वजन काटा पुरविन्याचे काम करत होते.
दरम्यान, मनोजची हत्या कोणी आणि का केली याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
दादरसारख्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.