ठाण्यातील मानपाडा भागातल्या पाच गोडाऊनला आग
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2017 07:58 AM (IST)
ठाणे : ठाण्यातील मानपाडा भागातील पाच गोडाऊनला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतं आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मानपाडा भागातील एका गोडाऊनला आग लागली. ही पाचही गोडाऊन एकमेकाला लागून असल्याने आगीने क्षणार्थात रौद्र रुप धारण केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच तीन टँकरही आग विझवण्यासाठी मागवण्यात आले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. तरी ही आग कशामुळे लागली याचा शोध सध्या सुरु आहे.