भायखळ्यात चाळीला आग, 10 ते 12 घरं भक्ष्यस्थानी
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2018 08:03 AM (IST)
अत्यंत भीषण आग लागल्याने चाळीतील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई : भायखळ्यात काल रात्री पलमजी रतनजी चाळीत भीषण आग लागली होती. चाळीत एका बंद घराला प्रथम आग लागली. आग पसरत जाऊन आजू बाजूच्या 10 ते 12 घरांमध्ये पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं. अत्यंत भीषण आग लागल्याने चाळीतील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. बातमीचा व्हिडीओ :