मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वसूल केल्या जाणाऱ्या दंडात लवकरच मोठी वाढ होणार आहे.

 
दारु पिऊन गाडी चालवल्यास थेट 10 हजार रुपयांपर्यंत दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, तर गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

 

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि अपघातांना आळा बसावा यासाठी अधिकाधिक दंड वसूल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

 

दरम्यान गेल्या काही महिन्यांत झालेल्या अपघातांमध्ये अल्पवयीन चालकांचं प्रमाण मोठं होतं. त्याला आळा घालण्यासाठी अशा अपघातांमध्ये मुलांच्या पालकांना दोषी ठरवण्यात येणार आहे.