मुंबई: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज (सोमवार) सकाळी 11.30 वाजता ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना जीएसटीवर एक प्रेझेंटेशन देणार असल्याचं वृत्त समजतं आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार आणि अर्थ खात्यातील अधिकारी उद्धव ठाकरेंना जीएसटीवर प्रेझेंटेशन देणार आहेत.


जीएसटीच्या मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी शिवसेनेच्या साथीनं केला होता. त्यामुळे विशेष अधिवेशनात शिवसेनेनं अडचणीत भाजपला आणू नये यासाठी आतापासूनच भाजपनं कंबर कसली आहे.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जीएसटीबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. ‘जर लाचार होऊन महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल. सुरूवातीपासून आमची हिच मागणी आहे की महापालिका ही अबाधित राहिली पाहिजे. भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभं रहावं लागणार असेल, तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल.’ असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला होता.

या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भाजप शिवसेनेचं मन वळविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी एक खास प्रेझेंटेशन तयार करण्यात आलं असून अर्थ खात्यातील संबंधित अधिकारी हे प्रेझेंटेशन देणार आहेत.

दरम्यान, यावेळी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सुनील प्रभू हे देखील या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी!

GST विधेयक अधिवेशन 17 मे ऐवजी 20, 21, 22 मे रोजी होणार आहे. 18 आणि 19 मे रोजी श्रीनगर इथं अर्थमंत्र्यांनी GST कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला अर्थमंत्र्यांना उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे जीएसटीसाठी बोलवण्यात आलेलं अधिवशेन पुढे ढकलण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या:

‘निवडणुकीच्या तयारीला लागा’, उद्धव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना आदेश

यूपीत योगी सरकार, महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार : उद्धव ठाकरे

पाकड्यांशी 'मन की नाही तर गन की बात' करा : उद्धव ठाकरे

GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी !