ठाणे : भिवंडी मनपा कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान आणि वेतनासाठी भव्य 'भीक मांगो' आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचाऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनाला सुरुवात केली.


दिवाळी होऊनही सानुग्राह अनुदान आणि वेतन न मिळाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे.



अनुदान आणि वेतन दिवाळीपूर्वी देण्याचं आश्वासन प्रशासनाने दिल्याचा दावा कर्मचाऱ्यांचा आहे. मात्र प्रशासन कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप, कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळेच संतप्त कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.

त्याचा परिणाम म्हणून शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. इतकंच नाही तर पालिकेतील सर्व व्यवहार ठप्प आहेत.