मुंबईः मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनवर रिक्षाचालकाने जवळचं भाडं नाकारल्याने प्रवासी आणि रिक्षाचालकात वाद झाला. त्यानंतर स्टेशनवरील इतर रिक्षाचालकांनी मिळून प्रवाशाला बेदम मारहाण केली.

रिक्षाचालकांच्या या गुंडगिरीनंतर प्रवाशांनीही त्याला उत्तर देत 2-3 रिक्षांची तोडफोड केली. दरम्यान रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या या मारहाणीत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

या निमित्ताने रिक्षाचालकांची अरेरावी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रवाशाने केवळ जवळचं भाडं का नाकारता असा सवाल केल्यामुळे रिक्षाचालकांचा संताप अनावर झाला. त्याचं रुपांतर मारहाणीत झालं.