वसई : क्षुल्लक कारणावरुन संतापाचा पारा चढल्याने टोकाचं पाऊल उचलणाऱ्यांच्या प्रमाणात सध्या वाढ होताना दिसत आहे. वसईतही क्षुल्लक बाबीवरुन झालेल्या वादातून एकाने चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याचं वृत्त आहे.
वसईत राहणारी पीडित व्यक्ती पाण्याने स्वतःची बाईक स्वच्छ करत होती. यावेळी शेजारुन जाणाऱ्या आरोपीच्या अंगावर पाणी पडलं. याच रागातून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि क्षुल्लक वादाचं पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झालं.
हल्ल्यामध्ये चार जण जखमी झाले असुन त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वसई पूर्वमधील नवजीवन शांतीनगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.
बिहार निवडणक एक्झिट पोल 2025
(Source: Poll of Polls)
बाईक धुताना अंगावर पाणी उडाल्याने चौघांवर जीवघेणा हल्ला
एबीपी माझा वेब टीम Updated at: 23 Aug 2016 04:37 AM (IST)