मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. त्यामुळे प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. सुशांत प्रकरणात ज्या सिद्धार्थ पीठानीचा तपास सीबीआय मागील तीन दिवसांपासून करत आहे. यात सुशांतसिंहला भूत-प्रेताची भीती वाटत असल्याचं सिद्धार्थने सांगितलंय. सिद्धार्थ पीठानीने तपास पथकाला दिलेला EXCLUISVE माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. सिद्धार्थ पीठानीचा जबाब त्याच्याच शब्दात.
मी वर नमूद पत्त्यावर (माऊंट ब्लॅक) दिनांक 20.1.20 रोजी सुशांत सिंह राजपूत यांच्या बरोबर राहण्यास आलो होतो. माझं मुळ गाव धनवर्षा. हैदराबाद येथे माझे वडील रमणामूर्ती, आई शोभा आणि बहीण वर्षा हे वास्तव्यास आहेत. माझे वडील लोबो दिझाईन व ग्राफिक्स प्रीटिंगच काम करतात. सदरचा व्यवसाय माझे वडील घरातूनच करतात. माझं पहिली ते दहावी शिक्षण भाषम पब्लिक स्कूल आणि अकरावी ते बारावी शिक्षण चैतन्य ज्युनिअर कॉलेज येथून सायन्स मधून 2010 मध्ये झाले. मला चित्रपट मधील ॲनिमेशन आणि डायरेक्शनची आवड असल्याने मी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन येथून फिल्म अँड व्हिडिओ कम्युनिकेशन याचे प्रशिक्षण घेण्यासाठी अहमदाबाद येथील इन्स्टिट्यूट मध्ये दाखल झालो. सदरचा कोर्स हा साडेचार वर्षाचा होता कोर्स दरम्यान मी माझे फ्रीलान्सिंग चे काम सुरू ठेवले. सदर बाबींमुळे कोर्स हा 2015 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होता मात्र तो 2019 मध्ये पूर्ण झाला. यापूर्वी मी फ्रीलान्सिंग काम करत होतो.
2017 मध्ये सॅक्रेड फिग डिझाईनमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करू लागलो. सदर कंपनीत मला महिना 40 हजार पगार होता. सदर कंपनीमार्फत व्हिडिओ बनवणे, डायरेक्शनची कामे करणे आणि इत्यादी काम करत होतो. माझ्या हाताखाली तीन व्यक्ती होते. सदर कामं मी जयपुरवरून करत होतो.
सदर ठिकाणी काम करत असताना 2018 मध्ये आयुष शर्माची ओळख झाली. आयुषचे मोबाईलवर सतत संपर्कात होतो. आयुष आणि सुशांत सिंग राजपूत चांगले मित्र होते आणि मुंबईला आल्यावर मला वेगवेगळ्या प्रकारची काम मिळेल असं मला आयुष्याने सांगितलं. तसेच मी मुंबईला आल्यास माझ्या राहण्याची संपूर्ण व्यवस्था करून देतो असेही त्याने मला सांगितलं. तसेच एप्रिल 2019 च्या पहिल्या आठवड्यात मी जयपूर येथून मुंबईला विमानाने आलो आणि आयुष्य माझ्या राहण्याची वेवस्था मुंबई वांद्रे येथील बॅक पॅकर्स हॉटेलमध्ये केली. हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आयुष्याला फोन केला असता दुसऱ्या दिवशी सुशांत सिंग राजपूत याच्या कॅप्री हाईट्सच्या घरी जाणार असल्याचं आयुष्यनं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी मी आणि आयुष्य सुशांतच्या घरी गेलो. त्यावेळी सुशांतच्या घरी दीपेश सावंत, सॅम्युअल हॉफिस, अब्बास, अशोक व केशव तसेच आणखीन दोन इसम होते. सुशांत हे 15 व 16 व्या माळ्यावर राहत होता. या खोली ही 5 बेडरूम 2 हॉल 1 किचन आणि घरातच लिफ्ट अशी होती. त्याच दिवशी सुशांतची मॅनेजर आकांक्षा हीने मला सांगितलं की सुशांतचे 150 ड्रीम्स असून त्याकरिता मला बोलाल्याच तिने सांगितलं. सदर प्रोजेक्टमध्ये सुशांत सिंग राजपूत आयुष्य आकांक्षा आणि मी होतो. सदर ड्रीममध्ये समाजसेवा, शिक्षण, महिला उद्योग, अंध मुलांना कम्प्युटर शिकवणे, फेडरर बरोबर टेनिस मॅच खेळणे, दोन्ही सोबत क्रिकेट खेळणे.
इत्यादी ड्रीमस होते, सदर टीम मध्ये मी व्हिडिओ ग्रीफ एडिटिंग त्यासाठी मला टीम देणार होते. त्यानंतर मी दोन ते तीन दिवस आयुष शर्मा राहत असलेल्या मरोळ अंधेरी येथील जॉस्टल हॉटेल मध्ये राहू लागलो. सुशांत सिंग यांच्याबरोबर काम करताना आम्हाला कुठेलही मानधन मिळणार नाही. मात्र, आमच्या गरजा सुशांत सिंग राजपूत पुरवणार असल्याचं सांगण्यात आले.
मी हॉस्टलमध्ये राहत असताना यांनी तीन ते चार गाड्यांनी मला, आयुष शर्मा, आकांक्षा, आकांक्षाची बहिण, बहिणीची मैत्रीण, सुशांत व तिची बहीण प्रियांका व तिथे पती सिद्धार्थ, रिया चक्रवर्ती, रियाची मैत्रीण, कुक आणि इतर दोन जण असे एकूण पावना डॅम येथील फार्म हाऊस मध्ये पिकनिकला गेलो होतो. सदर ठिकाणी 3 ते 4 दिवस राहून परत आलो. सदर ठिकाणी राहात असताना प्रियंकामध्ये भांडण झाले होते. त्यावेळी सुशांतने रिया चक्रवर्तीची बाजू घेतली होती. याचाच राग धरून प्रियांका आणि तिचे पती 2 ते 3 दिवसानंतर सुशांतच घर सोडून निघून गेले.
काही दिवसांनी सुशांतने मला आणि आयुषला त्याच्या घरी बोलवून त्याच्या सोबतच राहण्यास सांगितले. म्हणून त्या ठिकाणी राहावयास गेलो. त्यावेळी मला समजले की प्रियांका ही नेहमी नोकरांना घालून पाडून बोलत असल्याने अब्बास आणि दीपेश हे देखील या पूर्वी घर सोडून निघून गेले होते. सदर फ्लॅट मध्ये सुशांत सिंग राजपूत, सॅम्युअल हॉकिस व जेवण बनवणारे अशोक व केशव तसेच घराची साफसफाई करणारे दोघे इसम असे राहत होते. सदर ठिकाणी राहत असताना मी सुशांत सिंग यांच्या जुन्या कॉम्प्युटर वर एडिटिंग करणे, पावना डॅम, लोणावळा येथील फार्म हाऊस येथे देखील व्हिडीओ एडिटिंग रेकॉर्ड करत होतो. आम्ही 20 दिवस वांद्रे येथे तर 10 दिवस पावना डॅम येथे व्हिडीओचे एडिटिंग रेकॉर्डिंगचे काम करत होतो.
सुशांतच्या केप्री हाइट्स घरात भूत-प्रेत असल्याचा भास सुशांतला होत होता. सुशांतला ते घर सोडायचं होतं, सुशांतलया नेहमी वाटायचं की त्या घराच्या गेस्ट हाउस मध्ये कोणीतरी राहतं. जेव्हा रिया आणि तिचा भाऊ शोविक तेथे राहायला आले तेव्हा त्यांनाही तसाच भास झाला. याच कारणाने सुशांत केप्री हाईट्स मधील घर सोडण्याचा विचार करू लागला.
सुशांतच्या घरी सॅम्युअल हॉकिस पण राहत होता, तो सुशांतच्या घरची कामं करायचा, एकदा सुशांतने त्याला घर खर्चाचा हिशोब विचारला जे तो देऊ शकला नाही. त्याच्यावर सुशांत त्याच्यावर ओरडला. ज्या नंतर सेंड घर सोडून निघून गेला. त्यानंतर सुशांत पण दुःखी झाला होता. मग जून 2019 मध्ये सुशांत, रिया, आकांक्षा, आनंदी, आयुष आणि आयुषचा मित्र हिमांशु लद्दाखला गेले. त्याच्यानंतर सुशांतने आकांक्षाच्या जागी आनंदीला आपलं सेलिब्रिटी मॅनेजर बनवलं.
सुशांतला त्याच्या घरी अस्वस्थ वाटू लागल्याने तो वॉटर स्टोन रिसॉर्टमध्ये त्याची मेंबरशिप असल्याने तेथेच स्वीट मध्ये जास्त वेळ राहू लागला. सदर ठिकाणी ते जिम स्विमिंग बॅडमिंटन आणि ट्रेनिंग करत होते. केप्रि हाइट्स मध्ये सुशांत सिंग याला राहायला आवडत नसल्याने तो वाटर स्टोन आणि पावना डॅम येथे आमच्यासह जास्त वेळ राहू लागला आणि अशाप्रकारे तो स्वतावर आणि आमच्यावर जास्त खर्च करू लागला. त्यादरम्यान सुशांतला टायटन आणि बाटा त्या जाहिराती मिळाल्या व त्याच्यावर सुशांत आणि मी सोबत काम करत होतो. सुशांत ज्या ज्या ठिकाणी कामासाठी जात होते. त्या त्या ठिकाणी मी बॉडीगार्ड साहिल व मॅनेजर हे सोबत जात होतो.
ऑगस्ट व सप्टेंबर 2019 च्या दरम्यान सुशांत हे आपल्या कामावर कमी लक्ष देत होते आणि आपली मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यासोबत जास्त वेळ घालवत होते. ते 150 ड्रीम याच्या पासून लांब जाऊ लागले. तसेच वॉटर्स स्टोनच्या डबल बेडरूम स्वीट मध्ये एकटेच राहू लागले. त्याच दरम्यान सुशांत सिंग यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या स्वित्झर्लंड फ्रान्स आणि इतर ठिकाणी जाण्याचा बेत आखत असून ते आमचा कोणाचाही विचार करत नसून सर्व गोष्टी रिया चक्रवर्ती हिच्याशी करत होत्या. त्यामुळे आयुष शर्मा हा राहण्यासाठी पुन्हा हॉस्टेलवर गेला तर काही दिवसांनी मी ही हॉस्टेलवर राहण्यासाठी जात असले तर सुशांतला सांगितलं. वडिलांचा व्यवसाय नीट चालत नसल्याने पैशाची अडचण येत असल्याचं वडिलांनी मला सांगितलं म्हणून त्यांचं काम पाहण्यासाठी मी हैदराबादला गेलो. जाण्यापूर्वी मी सुशांत सांगितलं की तिथलं काम आटपून मी पुन्हा मुंबईला येईल.
मी हैदराबादला गेल्यानंतर मला पाच दिवसांनी इनोरा इंडिया या इनोव्हेशन करणाऱ्या कंपनीत क्रिएटिव डायरेक्टर महिना पंचेचाळीस हजार रुपयांची नोकरी मिळाली. त्याच दरम्यान सुशांत आणि रिया युरोपला गेल्याचं मला समजले.
जानेवारी 2020 च्या दुसऱ्या आठवड्यात सुशांत सिंग यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी अॅक्टिंग सोडत असून आपण दीडशे ड्रीम प्रोजेक्ट वर काम करू आणि त्यांची मनाची स्थिती नीट नसल्याचंही त्यांनी मला सांगितलं. माझी नुकतीच नोकरी लागली असल्याचं मी त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी मला यावेळेस पगार देण्याचे सांगितले. मग मी अहमदाबाद येथून सुशांत सिंग यांच्या माऊंट ब्लॅक या घरात गेलो. तेव्हा सुशांत बेडरूम मध्ये बसले होते. मला पाहताच त्यांनी मला मिठीत घेतलं आणि ते रडू लागले आणि त्यांनी मला सांगितलं की मी अॅक्टिंग सोडणार असून घरातलं सर्व सामान विकून आणि पावना डॅम येथील फार्महाऊसवर शिफ्ट होऊ. तसेच आपल्याला यापुढे तीस हजार रुपये महिन्यात घर चालवायचं आहे.
पावना डॅम येथील शेती करू असे सांगितलं. त्याच वेळी त्यांनी मला त्यांच्या समोरील रूममध्ये राहण्यास सांगून दिपेशला ही आपण येथे राहण्यास बोलवलं असल्याच सांगितलं. मी जेव्हा रिया बद्दल विचारलं त्यावेळेस त्यांनी रडायला सुरुवात केली आणि सांगितलं की सर्वजण मला सोडून गेले. त्यावेळी मी तुमच्या सोबत राहतो, असे सांगून त्यांना शांत केलं. सदरचे घर हे डिसेंबर 2019 मध्ये घेतल्याचं मला कळलं. हाऊस मॅनेजर मिरांडा यांच्याकडे विचारना केली असता तेव्हा मला कळले की रिया चक्रवर्ती सुशांतच्या कार्ड वरून खूप शॉपिंग करायची आणि घरातलं सामान विकायचं आहे, असेही मला सांगितले. हाऊस मॅनेजर मिरांडा आणि श्रुती मोदी हे सकाळी दहा वाजता येत होते आणि सायंकाळी सहा वाजता जात होते. दुसऱ्या दिवशी दीपेश ही आमच्यासोबत राहण्यास आला. तसेच रिया चक्रवर्ती परत आली आणि घराच्या बारीक-सारीक बाबींवर लक्ष ठेवू लागली. तिने सांगितलं की मी आणि दीपेश असे आपण तिघे मिळून सुशांतला सांभाळायचं आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुशांत सिंग यांनी मला सांगितले की चंदीगड येथील बहिणीकडे एक महिना राहावयास जायचं आहे. त्यावर मी सुशांत सिंग त्याची बहीण मितू आणि त्याचा बॉडीगार्ड साहिल सागर असे मिळून रेंज रोव्हर कारन् निघालो आणि तिसऱ्या दिवशी सकाळी चंदिगडला पोहोचलो. आम्ही प्रवास करत असताना आमदाबाद व गुडगाव येथे रात्री थांबलो होतो. गुडगाव येथे थांबलो असताना सुशांत सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच ते टेन्शनमध्ये घाबरल्या सारखे वाटू लागले. त्यावेळेस मी डॉक्टर चावला यांनी लिहून दिलेल्या गोळ्या दिल्या नंतर सुशांतला बरं वाटलं.
दुसऱ्या दिवशी सुशांत सिंगची चंदीगड येथील बहिणी नीतूने मला फोन केला व घरी बोलावून सुशांत बद्दल विचारणा केली. तेव्हा मी मुंबईतील सर्व हकिकत तिला सांगितली. त्यानंतर करशील चावला यांनी लिहून दिलेल्या गोळ्यांचा डबा मी नितूला दिला आणि आम्ही गेस्ट हाऊसमध्ये राहण्यास गेलो. दुसऱ्या दिवशी मला सुशांतने फोन केला व व मुंबईला निघायचं आहे,असं सांगितलं. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा सुशांतची तब्येत ठीक असल्याचे चेहऱ्यावरुन दिसून आलं. त्यानंतर नितुने मला सुशांतच्या तब्येतीकडे लक्ष देण्यास सांगितलं. नंतर मी सुशांत बॉडीगार्ड साहिल आणि चालक असे मुंबईला निघून आलो. नितू चंदीगड मध्येच राहिली.
मुंबईत आल्यानंतर मी सुशांतला डॉ. चावला यांनी दिलेले औषध वेळेवर देत होतो. सुशांतनेही नियमित कामकाज सुरू केले. पूर्वीप्रमाणेच सुशांतला बरे वाटू लागले. यानंतर सुशांत रियाबरोबर राहू लागला. त्याचवेळी दिग्दर्शक आनंद गांधी आणि रुमी जाफरे यांनी सुशांतला चित्रपटाची ऑफर दिली. सुशांतला बरे वाटू लागले, म्हणून मी औषध बंद करतो असे सुशांत म्हणाला. मग मी त्यांना अचानक औषध बंद करू नका असा सल्ला दिला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुशांतची तब्येत पुन्हा खालावू लागली. ते आमच्या पासून दूर होऊ लागले. पण त्यावेळी रिया त्याच्यासोबत होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुशांतची प्रकृती आणखी खालावली. तो बेडरुम मध्ये एकटाच राहू लागला, आमच्याशी बोलणेही बंद केले. म्हणून आम्ही सर्वांनी रिया आणि सुशांतला एकटे सोडले. लॉकडाऊनमध्ये रिया सुशांतसोबत होती.
8 जून रोजी सकाळी 11.30 वाजता रिया तिची बॅग भरुन घर सोडून गेली. रियाने मला सुशांतची काळजी घ्यायला सांगितले. त्यावेळी सुशांतने रियाला मिठी मारली आणि तिला बाय केला. थोड्या वेळाने सुशांतची बहीण नितू घरी पोहोचली. नितू दीदी सुशांतला खायला फोर्स करत होती. पण सुशांतनं जास्त खाल्ल नाही. ती सुशांतला आमच्यात गप्पा मारण्यास सांगत होतो, प्रयत्न करीत होतो पण सुशांतने यात रस दाखविला नाही. नितू दीदी घरी असताना सुशांत जुन्या गोष्टी आठवत वारंवार रडत होता. आणि त्याचवेळी सुशांतला दिशाच्या मृत्यूची बातमी मिळाली. ही बातमी ऐकून सुशांत अस्वस्थ झाला. त्यानंतर सुशांतने कॉर्नर स्टोन नावाच्या कंपनीचे मॅनेजर उदय यांच्याशी वारंवार बोलणे चालू ठेवले. सृष्टी मोदी यांच्या पायाला दुखापतीमुळे या कंपनीने सुशांतचे सेलिब्रिटी मॅनेजरचं काम पाहण्यासाठी काही दिवस दिशाला पाठवल होत. 9 जून रोजी दिशाच्या आत्महत्येनंतर सुशांतच्या कलाकार मॅनेजरच्या आत्महत्येची बातमी सगळीकडे येताच सुशांत खूप तणावग्रस्त झाला होता. या तणावामुळे सुशांतने मला त्या रात्री बेडरूममध्ये त्याच्याबरोबर झोपण्यास सांगितले आणि दिशाच्या मृत्यूची प्रत्येक माहिती देण्यास सांगितले. मी सुशांतला त्या प्रकरणाची सर्व माहिती देत राहिलो. त्यानंतर दुसर्या दिवशी सुशांतने मला त्याचे जुने व्हिडिओ, रेकॉर्डिंग आणि तारीख हटवायला सांगितले.
सुशांतसिंगची आर्टिस्ट मॅनेजर म्हणून असल्याची बातमी प्रसारमाध्यमात येत असल्याने सुशांत सिंगने जास्त टेन्शन घेतले. त्यामुळे सुशांतसिंगने मला त्याच्यासोबत रूममध्येचं राहण्यास सांगून सदर बातमीमधील माहिती वारंवार देण्यास सांगितले. मी सुशांतसिंग यांना माहिती देत होतो. दुसऱ्या दिवशी सुशांतसिंग यांनी मला त्यांनी शूट केलेले विडिओ, गाणी तसेच जुने विडिओ रेकॉर्डिंग असा जुना डेटा डिलीट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी स्वतः सुशांतसिंगच्या घरातील वर नमूद सर्व डाटा हार्डडिस्कमधून डिलीट केला. दिनांक 12/06/2020 रोजी संध्याकाळी नितू हिला तिच्या मुलीची आठवण झाल्याने तिला तिच्या घरी जाण्यासाठी चालकाशी व्यवस्था करून तिला कारने तिच्या घरी पोहचवले. दिनांक 13/06/2020 रोजी सुशांतसिंग यांची काही बिलाची रक्कम द्यावयाची असल्याने सुशांतसिंगने सर्वांची बिलाची रक्कम मोबाईल वरून पे केली. त्यावेळी मी सुशांतसिंगला मदत केली. त्यानंतर सुशांतसिंगने संध्याकाळी केवळ मँगो शेक घेतला. परंतु ते जेवले नाहीत.
दिनांक 14/06/2020 रोजी 10 ते 10.30 वाजताच्या सुमारास मी हॉल मध्ये आलो व सिस्टम वर गाणी ऐकू लागलो. साधारण 10.30च्या सुमारास केशव माझ्या जवळ आला व त्याने मला सुशांतसिंग दरवाजा उघडत नाहीत असं सांगितलं. म्हणून मी स्वतः सुशांतसिंगच्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, सुशांतसिंगने दरवाजा उघडला नाही. म्हणून मी सदरची बाब दीपेशला सांगितली. तेव्हा आम्ही दोघांनी सुशांतसिंगचा दरवाजा ठोठावला. परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्याच दरम्यान नितू दीदी हीचा मला फोन आला असता तिने मला सांगितले की, मी सुशांतला फोन करत असून तो फोन उचलत नाही. त्यावर मी तिला सांगितले की आम्ही सुद्धा सुशांतचा दरवाजा ठोठावत असून तो दरवाजा उघडत नाही. त्याच वेळी मी नितू दीदी यांना सुशांतच्या बांद्रा येथील घरी बोलावले. त्यानंतर आम्ही पुन्हा सुशांतचा दरवाजा ठोठावला. परंतु, तरिदेखील दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून दीपेश याने सुरक्षा रक्षकाला फोन करून चावी वाल्याला बोलावण्यास सांगितले. परंतु त्याने सदर बाबीस चांगला प्रतिसाद दिला नाही. म्हणून मी नेटवरून सर्च केलं असता मला रफिक लॉक स्मिथ अँड की मेकर यांचा मोबाईल क्रमांक मिळला. त्यावर मी दुपारी 1 वाजून 6 मिनिटांनी संपर्क साधला असता त्याने मला सदर लॉक बनवण्याचे 2 हजार रुपये सांगितले. त्याच वेळी मी सदर लॉकचा फोटो काढून पत्ता व्हॉट्सअप द्वारे पाठविला. त्यानंतर मी नितू दिदीला फोन करून चावीवाल्यास बोलावले असल्याचे सांगितले. दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी रफिक व त्याचा साथीदार घरी येऊन लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु लॉक उघडत नसल्याने मी राफीकला लॉक तोडण्यास सांगितले. रफिक याने लॉक तोडून उघडल्या नंतर मी रफिक यास त्याची रक्कम देऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर मी आणि दीपेशने रूम मध्ये प्रवेश केला. रूममध्ये अंधार असल्याने डावीकडील बटन लावून लाईट लावली. तेव्हा आम्हाला सुशांतने हिरव्या कुडत्याने बेडरूम मधील फॅनला गळफास घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यांचे पाय बेडच्या बाजूला खिडकीकडे तोंड असे लटकलेल्या अवस्थे दिसले. त्याच वेळी मी सदरची बाब नितू दिदीला सांगितली. त्याच वेळी मी माझ्या नंबर वरून 108 ला कॉल करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेचच सुशांतसिंग यांच्या चंदीगड येथील नितू दिदीचा फोन आला. तेव्हा त्यांना सदर घटनेची माहिती दिली. सदरची माहिती ऐकून तिने फोन ठेवला. त्यानंतर तिने मला पुन्हा फोन करून सुशांत आता कुठे आहे याची विचारणा केली असता मी तिला अजूनही सुशांत लटकलेला असून तो मृत असल्याचे सांगितले. त्यावेळी मागून नितू दिदीला तिचे पती ओपी सिंग हे सुशांतला खाली उतरवण्यास सांगत असल्याचे मला ऐकू आले. नितू दिदीने देखील मला सुशांतला खाली उतरवण्यास सांगितले. म्हणून मी घरकाम करणाऱ्या नीरजला चाकू आणण्यास सांगितले. मी व दीपेश गादीवर चढलो त्यानंतर दीपेश याने सुशांतला पकडल्यानंतर मी चाकूने सुशांतच्या गळ्या भवती गुंडाळलेलं कपड्याचे वरील टोक चाकूने कापले. व तसेच गादीवर दरवाजा कडे डोकं आणि बेडच्या खाली पाय असं सुशांतला ठेवलं. त्यावेळी मिथु दीदी घरी आली असता तिने मला सुशांत अजून जिवंत आहे का याची पडताळणी करण्यास सांगितले. व सुशांतला नीट गादीवर ठेवण्यास संगितले. मी दीपेश आणि नीरज असे तिघांनी मिळून सुशांतचे पाय उत्तर दिशेला आणि डोकं दक्षिण दिशेला उताण्यास्थितीत ठेवलं. त्यानंतर नीरज ने सुशांतने गळफास घेतलेल्या कापडाची गाठ सोडली. आणि कपडा बाजूला केला. मी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. परंतु सुशांतसिंग कोणताही प्रतिसाद देतं नव्हता. त्याचवेळी वांद्रे पोलीस आले.
Siddharth Pithani Statement | सुशांतसिंहला भूत-प्रेताची भीती वाटत होती,मित्र सिद्धार्थ पिठानीचा जबाब