हार्बर रेल्वे विस्कळीत, पनवेल-सीएसटी वाहतूक ठप्प
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2017 10:23 AM (IST)
कॉटनग्रीन स्टेशनजवळ रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने, हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे.
मुंबई: कामावर जाण्याच्या वेळीच हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. कारण पनवेलवरुन सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. कॉटनग्रीन स्टेशनजवळ रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने, हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वे मार्ग हा नेहमीच त्याच्या विस्कळीत आणि रखडणाऱ्या वाहतुकीमुळेच चर्चेत असतो. सातत्याने वाहतूक रखडणं हे या मार्गाचं वैशिष्ट्य आहे. नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्यांसाठी या मार्गाचाच पर्याय आहे. मात्र या मार्गावरील वाहतूक सतत विस्कळीत होत असल्याने, प्रवाशी चांगलेच वैतागले आहेत. या मार्गावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.