भिवंडी : भिवंडी शहरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे शॉर्ट सर्किटने विद्युत मीटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तरुणाचा जळून मृत्यू झाला. अनिल किसन हजारे असे 22 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने साठेनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनिल राहत्या घरात टीव्ही पाहत असताना अचानक शॉर्ट सर्किटने विद्युत मीटरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या आगीत घरातील कपडे, फ्रिज, टीव्ही व अन्य सामानाने पेट घेतल्याने घरात विद्युत प्रवाह उतरला होता. त्यात अनिल जागेवरच कोसळून खाली पडला.  आगीच्या लोळात तो सापडल्याने त्याच्या संपूर्ण शरीराचा कोळसा झाला.

अनिल बिगारी काम करून आई, मोठा भाऊ, वहिनी आदींच्या सोबत राहत होता. या आगीच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास पोलीस डी.एल. शिंपी करीत आहेत.